Panpoi Marathi Kavita Question Answer – Class 6 Marathi

“पाणपोई” ही इयत्ता ६वी च्या मराठी पाठ्यपुस्तकातील एक सुंदर कविता आहे. या कवितेत रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांसाठी पाणी पिण्याची सोय करणाऱ्या पाणपोईचे व रांजणाचे वर्णन केले आहे.

This poem from the Class 6 Marathi textbook describes a Panpoi — a roadside water station — and how it serves everyone equally, from a king to a commoner. Below you will find complete question answers, synonyms (समानार्थी शब्द), antonyms (विरुद्धार्थी शब्द), and sentence usage exercises.

१७. पाणपोई

उन्हात घामेजुनी अंगाची होतीया लाहीलाही
सूर्यकिरणांची लागती उष्णगरम झळाई,
आठवते दध उन्हातली थंडगार सराई
वटवृक्षाच्या सावलीत थाटलेली पाणपोई.

रखरखत्या उन्हात सुटतो अवखळ वारा
धुळीसंगे पालापाचोळा जाई या उंच अंबरा,
थकलेल्या वाटसरूला ग्लानी येती गरागरा
पिऊनी पाण्याचा घोट तेव्हा महत्व कळे खरा.

या दिवसांत चोहीकडे पडते कडक ऊन
सारखीसारखी लागते साऱ्यांना मोठी तहान,
पिण्यास ठेवतात पाण्याने भरलेले रांजण
'रंक असो वा राव,' हे पाणी पितात सारेजण!

झाकलेला लाल कपडा, गार पाणी रांजणात
भरपेट पाणी पिऊनी तृप्त वाटते मनात,
धन्य असो ज्याने थाटिली ही पाणपोई उन्हात
पिऊनिया पाणी दुवा देती सारे त्या सज्जनास.

– अय्युब पठाण लोहगावकर

प्र.१ एका वाक्यात उत्तरे लिहा (Q.1 Write answers in one sentence)

१) “पाणपोई” म्हणजे काय?
उत्तर – “पाणपोई” म्हणजे रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांसाठी पाणी पिण्याची सोय. (A Panpoi is a roadside drinking water facility provided for passersby.)

२) उष्णता कशामुळे वाढते?
उत्तर – सूर्यकिरणांमुळे उष्णता वाढते. (Heat increases because of sunrays.)

३) पाणपोई कुठे ठेवली आहे?
उत्तर – पाणपोई वडवृक्षाच्या सावलीत ठेवली आहे. (The Panpoi is kept in the shade of a banyan tree.)

४) थकलेल्या वाटसरूची घलाणी केव्हा उडते?
उत्तर – पाणपोईचे पाणी पिल्यावर थकलेल्या वाटसरूची घलाणी उडते. (A tired traveller’s fatigue vanishes after drinking the Panpoi’s water.)

५) कडक उन्हामुळे लहान लागल्यावर वाटसरू काय करतात?
उत्तर – कडक उन्हामुळे लहान लागल्यावर वाटसरू रांजणातले थंडगार पाणी पितात. (When parched by the scorching sun, travellers drink the cool water from the Ranjan.)

६) “रांजण” म्हणजे काय?
उत्तर – “रांजण” म्हणजे थंडगार पाण्याचे मातीचे मडके. (A Ranjan is a large earthen pot used to store cool water.)

७) रांजणातले पाणी कोणासाठी?
उत्तर – रांजणातले पाणी राजा अथवा रंक, गरीब अथवा श्रीमंत या सर्वांसाठी. (The water in the Ranjan is for everyone — king or pauper, poor or rich.)

८) सज्जनास आशीर्वाद कोण व का देतात?
उत्तर – पाणी पिऊन आपली तहान भागवणारे लोक पाणी पाजणाऱ्या सज्जनास आशीर्वाद देतात, कारण त्या सज्जनाने लोकांना भर उन्हात पाणी पाजले आहे. (Those who quench their thirst bless the kind-hearted person who set up the Panpoi, for he offered water to all in the scorching heat.)


प्र.२ खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा (Q.2 Use the following words in sentences)

थंडगार – मी उन्हाळून आल्यावर थंडगार पाणी प्यायलो. (I drank cool water after coming in from the hot sun.)

रांजण – आईने रांजणात पाणी भरून ठेवले. (Mother filled the earthen pot with water.)

अंबर – अंबरात सूर्य आहे. (The sun is in the sky.)

धूळ – रस्त्यावर खूप धूळ होती. (There was a lot of dust on the road.)

घलाणी – मला चालता-चालता घलाणी आली. (I felt exhausted while walking.)


प्र.३ समानार्थी शब्द लिहा (Q.3 Write Synonyms)

#शब्द (Word)समानार्थी (Synonym)English Meaning
वारापवनWind / Breeze
पाणीजलWater
अंबरआकाशSky
गारथंडCool / Cold
दुवाआशीर्वादBlessing / Prayer

प्र.४ विरुद्धार्थी शब्द लिहा (Q.4 Write Antonyms)

#शब्द (Word)विरुद्धार्थी (Antonym)English Meaning
थंडगरमCold ↔ Hot
रंकराजाPauper ↔ King
तृप्त अतृप्तSatisfied ↔ Unsatisfied
ऊनसावलीSunshine ↔ Shade
उंचठेंगणेTall ↔ Short

📌 परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे (Important Exam Points)

“पाणपोई” म्हणजे काय हे नक्की लक्षात ठेवा

रस्त्यावरून येणाऱ्यांसाठी पाण्याची सोय. (A roadside water facility for passersby.)

“रांजण” हे मातीचे मडके आहे जे पाणी थंड ठेवते. (An earthen pot that keeps water cool.)

कवितेचा मुख्य संदेश: पाण्याची सेवा सर्वांसाठी समान — राजा असो किंवा रंक. (The main message: water is for everyone equally.)

समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द नियमित पाठ करा — ते परीक्षेत थेट विचारले जातात.

वाक्यप्रयोगात शब्दाचा अर्थ स्पष्ट होईल असे वाक्य लिहा.

Leave a Comment